बस अपघातांना वरिष्ठांचा दबाव कारणीभूत!

एसटी बसेसच्या अपघातांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव कारणीभूत असल्याचा आरोप एसटी कामगार संघटनेनं केला आहे. यापुढे जादा ड्युटी लादल्यानंतर अपघात झाल्यास अधिकाऱ्यांना भर चौकात नेऊन जाब विचारला जाईल असा इशारा संघटनेनं दिला आहे.

Updated: Feb 22, 2012, 06:06 PM IST

www.24taas.com, मुंबई

एसटी बसेसच्या अपघातांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव कारणीभूत असल्याचा आरोप एसटी कामगार संघटनेनं केला आहे. यापुढे जादा ड्युटी लादल्यानंतर अपघात झाल्यास अधिकाऱ्यांना भर चौकात नेऊन जाब विचारला जाईल असा इशारा संघटनेनं दिला आहे.

कामापेक्षा जास्त तास ड्युटी करावी लागत असल्यानं एसटीचालक त्रासले आहेत. जादा काम लादल्यामुळेच अपघातांचं प्रमाण वाढलं असल्याचा आरोपही एसटी कामगार संघटनेनं केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांज्यात एसटी कामगार संघटनेचा मेळावा पार पडला आहे.

अधिकाऱ्यांनी जादा काम दिल्यास त्यांना भर चौकात जाब विचारण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. तसंच सहा मार्चपासूनच नियमानुसार काम बंद आंदोलन करण्याची घोषणाही यावेळी कऱण्यात आली.