भारत बंद : नुकसान केल्यास दंड

एनडीएने पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ उद्या ३१ मे रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे., या बंद दरम्यान काही नुकसान झाल्यास बंदकर्त्या संघटना आणि राजकीय पक्षांकडून दंडाच्या रूपाने होणाऱ्या नुकसानीची वसुली केली जाणार आहे.

Updated: May 30, 2012, 02:59 PM IST

www.24taas.com, मुंबई

एनडीएने पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ उद्या ३१ मे रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे., या बंद दरम्यान काही नुकसान झाल्यास बंदकर्त्या संघटना आणि राजकीय पक्षांकडून दंडाच्या रूपाने होणाऱ्या नुकसानीची वसुली केली जाणार आहे.

मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेनंतर अतिरेकी कारवायांच्या निषेधार्थ शिवसेना - भाजपाने बंद पुकारला होता. तेव्हा त्यांच्याकडून प्रत्येकी १0 लाख रुपयांच्या दंडाची वसुली न्यायालयीन आदेशानुसार करण्यात आली होती. गृहखात्याच्या सूत्रांनी सांगितले, की ३१ मेच्या बंददरम्यान काही नुकसान झाल्यास याच पद्धतीने नुकसानीची वसुली केली जाईल.

बंदकाळात झालेल्या नुकसानीची वसुली बंदकर्त्यांकडून करण्याचे आदेश केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिले होते. पुढे सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले होते. दरम्यान, बंद दरम्यान  होणार्‍या नुकसानीची आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे स्पष्टीकरण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.  मुनगंटीवार यांनी मनसेसह  सर्व पक्षांनी बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले.