मुंबईत दोन दिवसात मान्सून

मुंबई मान्सून अवघ्या दोन दिवसांमध्ये दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. यंदा मान्सून १० जूनला दाखल होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता.

Updated: Jun 17, 2012, 03:15 PM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबई मान्सून अवघ्या दोन दिवसांमध्ये दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. यंदा मान्सून १० जूनला दाखल होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता.

१० जूनचा अंदाज असताना मात्र मुंबईत अजून पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. वाढत्या उकाड्याने मुंबईकर त्रस्त झालेत. शनिवारी कुलाब्याचं तापमान ३१पूर्णांक ६डिग्री सेल्सिअस होतं. तर सांताक्रुजच तापमान ३२.८ डिग्री एवढं होतं. त्यामुळे मुंबईकर सध्या जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, मुंबईत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत  आहेत. मात्र, असे असले तरी १० ते १५ मिनिटेच या सरी कोसळत असल्याने उकाड्याने शहरवासिय त्रस्त झाले आहेत.