www.24taas.com, मुंबई
अनधिकृत शौचालय तोडल्यामुळे मुंबई महापालिकेतील वॉर्ड क्रमांक तीनची नगरसेविका शितल म्हात्रे - कुलकर्णी यांनी पालिका अभियंता आनंद नेरूरकरना मारहाण केली .या मारहाणीचा फौजदारी गुन्हा दाखल होऊन बोरीवली पोलिसानी म्हात्रे -कुलकर्णीन अटक केली होती.
शितल म्हात्रेची ही मारहाण सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अनधिकृत बांधकामाला संरक्षण देण्याचा शितल म्हात्रेनी गुन्हा केला आहे.त्यामुळे शितल म्हात्रे - कुलकर्णीच नगरसेवकपद रद्द करावं अशी मागणी म्युन्सिपल मजदूर युनियन पालिका आयुक्तकडे केली आहे.
मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक तीनच्या त्या नगरसेविका शितल म्हात्रे - कुलकर्णी याना आपल्या पदाचा विसर पडला. आणि त्यांनी पालिका अभियंता आनंद नेरूरकरना मारहाण केली. त्यामुळे आता त्यांच्यावर काय कारवाई होणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.