मुंबई : कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भगवान सहाय यांना सक्तीच्या सुटीवर पाठवल जाण्याची शक्यता आहे. सहाय यांच्यावरील आरोपांची चौकशी पूर्ण झाली आहे.
राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी याप्रकरणी चौकशी केली असून आजच याविषयीचा निर्णय घेण्यात येणार आहे. सहाय यांच्या विभागातले उपसचिव घाडगे वेळेवर घरी न आल्यानं त्यांच्या नैराश्यग्रस्त मुलाने आत्महत्या केली. घाडगे यांनी सहाय यांच्याकडे लवकर जाण्यासाठी परवानगी मागितली होती. पण ही परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळेच अखेर उपसचिव घाडगेंच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप आहे.
मंत्रालयातल्या कृषी विभागातले अपर मुख्य सचिव भगवान सहाय यांच्या विरोधात मंत्रालयातले कर्मचारी एकवटलेत. सहाय यांच्याविरोधात मंत्रालय कर्मचा-यांमध्ये संताप आहे. वरिष्ठ अधिका-याच्या आठमुठेपणामुळे एका अधिका-याला आपला मुलगा गमवाला लागला, असा आरोप करण्यात आला. काल मंत्रालयात आंदोलनही करण्यात आले.
मंत्रालयातील कृषी विभागाचे सहसचिव राजेंद्र घाडगे यांच्या मुलाने फोन करून त्यांना घरी लवकर बोलावले. घरी न आल्यास आत्महत्या करू, अशी धमकीही मुलाने दिली. त्यामुळे घाडगे यांनी कृषी विभागातल्या साहाय यांच्य़ाकडून लवकर घरी जाण्याची परवानगी मागितली. मात्र या आयएएस दर्जाच्या आडमुठ्या अधिकाऱ्याने घाडगे यांना परवानगी नाकारली, असा आरोप करण्यात आला आहे.
साडे पाच वाजता डयुटी संपल्याशिवाय घरी जाण्यास मज्जाव केला. अखेर घाडगे घरी न पोहचू शकल्यामुळे व्हायचे तेच झाले. त्यांच्या मुलाने आत्महत्या केली. शुक्रवारी हा संतापजनक प्रकार घडला. आता या भगवान सहाय यांच्यावर काय कारवाई होणार याकडे लक्ष आहे.