'स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपला उमेदवार आयात करावे लागतात'

आम्हाला स्वबळावर सत्ता द्या, असे सांगणाऱ्या भाजपला स्वत:चे उमेदवार का मिळाले नाहीत. त्यांना दुसऱ्यांचे उमेदवार आयात का करावे लागलेत. म्हणे स्वबळ, मी म्हणतो यांच्याकडे उमेदवार नाहीत, हे काय विकास करणार? असा सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपने आयात केलेल्या उमेदवारांची यादीच वाचून दाखविली.

Updated: Oct 6, 2014, 02:22 PM IST
'स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपला उमेदवार आयात करावे लागतात' title=

मुंबई : आम्हाला स्वबळावर सत्ता द्या, असे सांगणाऱ्या भाजपला स्वत:चे उमेदवार का मिळाले नाहीत. त्यांना दुसऱ्यांचे उमेदवार आयात का करावे लागलेत. म्हणे स्वबळ, मी म्हणतो यांच्याकडे उमेदवार नाहीत, हे काय विकास करणार? असा सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपने आयात केलेल्या उमेदवारांची यादीच वाचून दाखविली.

भाजपने महाराष्ट्रभरात अन्य पक्षाचे तब्बल ५१ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेतून आयात केलेल्या उमेदवारांची यादीच राज यांनी वाचून दाखविली. यात काँग्रेसचे १६, राष्ट्रवादीचे २०, शिवसेनेचे ९, मनसेचे २, शेतकरी संघटनेचा १, अपक्ष २ आणि  समता परिषदेच्या एकाचा समावेश आहे. 

गेली १५ वर्षे महाराष्ट्र खड्ड्यात घालणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनाच भाजपने प्रवेश देऊन तात्काळ उमेदवारी का दिली, असा सवालही केला जात आहे.

 

उमेदवार 

मतदारसंघ 

आधीचा पक्ष

     

मनोहर बडने 

धुळे ग्रामीण 

काँग्रेस

सुनील देशमुख 

अमरावती 

काँग्रेस

समीर मेघे 

हिंगणा 

काँग्रेस

माधवराव किन्हाळकर 

भोकर 

काँग्रेस

आनंद भरोसे 

परभणी 

काँग्रेस

शिवाजीराव नाईक 

शिराळा 

काँग्रेस

अजित घोरपडे 

तासगाव 

काँग्रेस

प्रशांत ठाकूर 

पनवेल 

काँग्रेस

राजन तेली 

सावंतवाडी 

काँग्रेस

संजय दुधगावकर 

उस्मानाबाद 

काँग्रेस

शैलेश लाहोटी 

लातूर 

काँग्रेस

माणिकराव कोकाटे 

सिन्नर 

काँग्रेस

बाळासाहेब मुरकुटे 

नेवासा 

काँग्रेस

भाऊसाहेब वाकचौरे 

श्रीरामपूर 

काँग्रेस

विलासराव खरात 

घनसावंगी 

काँग्रेस

अमोल महाडिक 

कोल्हापूर दक्षिण 

काँग्रेस

अभय नगरकर 

नगर 

राष्ट्रवादी

विजयकुमार गावित 

नंदुरबार 

राष्ट्रवादी

संजय सावकारे 

भुसावळ 

राष्ट्रवादी

योगेंद्र गोडे 

बुलढाणा 

राष्ट्रवादी

किसन कथोरे 

मुरबाड 

राष्ट्रवादी

मंदा म्हात्रे 

बेलापूर 

राष्ट्रवादी

लक्ष्मण जगताप 

चिंचवड 

राष्ट्रवादी

बबन पाचपुते 

श्रीगोंदा 

राष्ट्रवादी

शरद बुट्टे पाटील 

खेड 

राष्ट्रवादी

राहुल कुल 

दौंड 

राष्ट्रवादी

प्रताप चिखलीकर 

कंधार 

राष्ट्रवादी

स्नेहलता कोल्हे 

कोपरगाव 

राष्ट्रवादी

भीमराव धोंडे 

आष्टी 

राष्ट्रवादी

मोनिका राजळे 

पाथर्डी 

राष्ट्रवादी

जगदीश वळवी 

चोपडा 

राष्ट्रवादी

शिवाजी कर्डिले 

राहुरी 

राष्ट्रवादी

राजेंद्र पिपाडा 

राहाता 

राष्ट्रवादी

अद्वय हिरे 

नांदगाव 

राष्ट्रवादी

अरविंद चव्हाण 

जालना 

राष्ट्रवादी

रामदास सदाफुले 

देवळाली 

राष्ट्रवादी

भगवान बोरस्ते 

निफाड 

शिवसेना

किशनचंद तनवाणी 

औरंगाबाद मध्य 

शिवसेना

बाबासाहेब तांबे 

पारनेर 

शिवसेना

विनायक हिवाळे 

पैठण 

शिवसेना

शरद ढमाले 

भोर 

शिवसेना

नेताजी डोके 

जुन्नर 

शिवसेना

जयसिंग एरंडे 

आंबेगाव 

शिवसेना

चंद्रकांत खाडे 

इगतपुरी 

शिवसेना

दिलीप कुंदकर्ते 

नांदेड दक्षिण 

शिवसेना

संगीता राजे निंबाळकर 

पुरंदर 

मनसे

राम कदम 

घाटकोपर प. 

मनसे

संजय गव्हाणे 

कन्नड 

समता परिषद

प्रशांत बंब 

गंगापूर 

अपक्ष

अनिल गोटे 

धुळे 

शेतकरी संघटना

शिवाजी मानकर 

येवला 

अपक्ष उमेदवार

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.