www.24taas.com,मुंबई
मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे तीन दिवस मेगाहाल होत आहेत. सेंट्रेल मार्गावरची वाहतूक संथ झालीय. त्यामुळं कल्याण-ठाणे प्रवासासाठी तब्बल दोन तास लागत असल्याने मेगाहाल सुरूच आहेत. दरम्यान, घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकचे काम संपले आहे.
रेल्वेनं अभियांत्रिकी कामासाठी ठाणे ते दिवा स्टेशनदरम्यान मेगाब्लॉक घेतला होता. त्यामुळे जलद मार्गावरची वाहतूक धीम्या मार्गावरून वळवण्यात आली होती. याचा फटका प्रवाशांना बसतोय. रेल्वेची वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू आहे. सलग तीन दिवस प्रवाशांना दोन ते तीन तास ताटकळत प्रवास करावा लागला. त्यामुळे प्रवासीवर्गातून नाराजी व्यक्त होत होती.
काल रविवारी नोकरदारवर्गाला याचा फारसा फटका बसला नसला तरी खासगी क्षेत्रात काम करणारे कर्मचा-यांना मात्र सलग दोन दिवस लेटमार्कला सामोरं जावं लागलं होतं. आज सोमवारी मेगाब्लॉगचे काम पूर्ण झाले तरी लोकल वाहतूनक अजूनही धिमीच आहे. त्यामुळे ३० ते ४० मिनिटांनी उशिराचा प्रवास घडत आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची तोबा गर्दी दिसून येत आहे.