मुंबई : सनातन हे आरएसएस आणि भाजपचं पिल्लू असल्याची टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली आहे.
सनातला सरकारचा आतून पाठिंबा असल्याने डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांचे आरोपी मोकाट आहे. राज्य सरकारचे हे अपयश असल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना राणे यांनी कानपिचक्या दिल्यात. कोणत्याही व्यक्तीवर टीका करताना त्याचा दर्जा घसरणार हे पाहिले पाहिजे. मग ती कोणत्याही पक्षाची व्यक्ती असो. साहित्यातून विकास कसा होईल, यावर लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत राणेंनी व्यक्त केले.