मुंबई : सोमवारला लागून आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सुटीनंतर कामावर निघालेल्या मुंबईकरांना वाहतूक कोंडींचा फटका बसतोय.
पश्चिम द्रुतगती महामार्गावर रात्री एका टँकरमधून तेल गळती झाली. रस्ता निसरडा झाल्यानं अग्निशमन दलाच्या जवानांनी महार्मागावरील दोन रांगा बंद केल्यात. यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरून मुंबईक़डे येणारी वाहतूक कोंडी झालीय.
मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या खंडाळा घाटातल्या अमृतांजन पूल आणि खंडाळा बोगद्यादरम्यान आज १२ ते ४ या वेळेत सुट्ट्या झालेल्या दरडी पडण्याचं काम करण्यात येणार आहे. त्यासाठी या कालावधीत १५ मिनिटांचे दोन तर अर्ध्या तासाचे दोन असे चार ब्लॉक घेण्यात येतील. या काळात मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे आणि जुन्या हायवेवर वाहतूक खोळंबण्याची शक्यता आहे.