मुंबई : सोलापुरातल्या हुल्लडबाजीसारखा प्रकार पुन्हा होणार नाही, असं आश्वासन जोपर्यंत नरेंद्र मोदी देत नाहीत, तोपर्यंत मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलाय.
तसंच यावेळी मुख्यमंत्र्यांनी गडकरींवरही तोंडसुख घेतले. नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्री असून त्यांनी आता संपूर्ण देशाचा विचार करावा असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावलाय. तर असा प्रकार जाणीवपूर्वक कधीही केला जात नाही, पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बहिष्काराचं भांडवल करून राजकीय पोळ्या भाजू नयेत अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.
तर हुटिंगचा प्रकार चुकीचा असल्याचं गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलंय. मात्र अशा गोष्टी पंतप्रधान मोदी किंवा कुणाच्याही सांगण्यामुळे होत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.