मंत्रालयाची भीषण आग नियंत्रणात

मंत्रालयाला लागलेली आग नियंत्रणात आणण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव बांठिया यांनी दिली. या आगीची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही देण्यात आल्याचे ते यावेळी म्हणाले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 9, 2013, 05:54 PM IST

www.24taas.comमुंबई
मंत्रालयाला लागलेली आग नियंत्रणात आणण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव बांठिया यांनी दिली. या आगीची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही देण्यात आल्याचे ते यावेळी म्हणाले.
मंत्रालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर काम सुरू होते. यावेळी काही केमिकल्स सांडले. त्यामुळे आग लागली. ही आग आता आटोक्यात आली आहे. अग्निशामक दलाच्या पाच गाड्यांनी आग नियंत्रणात आणली गेली. कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. आम्ही कामाच्या ठिकाणी लक्ष ठेवून आहे, असे मुख्य सचिव बांठिया यांनी स्पष्ट केले.

याआधी चौथ्या मजल्यावर २१ जून २०१२ रोजी मंत्र्यालयाला २.४० मिनिटांनी लागही आग होती. आग लागण्याची दुसरी घटना असल्याने मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सुरक्षितेची काळजी घेतले नसल्याचे बोलले जात आहे.
मंत्रालयाच्या आगीचे नेमक कारण समजलं नसल्याने ही आग शॉर्टसर्कीटने लागल्याचे सांगण्यात येत होते. चौथ्या मजल्यावरील आग विझविण्याचा प्रयत्न सुरू होते.