www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यात तिसरी आघाडीची चर्चा सुरू झाली आहे. निमित्त होते शेकापचे नेते जयंत पाटील आणि जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांनी गुरुवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीचे. त्यामुळे मनसे कात टाकते आहे का, याची चर्चा सुरू झाली. मनसेचे बदलते रंग, अशीच काहीशी अवस्था दिसून येत आहे.
मनसेसह तिसरी आघाडी तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यातील लहान-लहान पक्षांची मोट बांधून हा पर्याय उभा करण्यासाठी शेकापचे जयंत पाटील आणि जनसुराज्यचे विनय कोरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर सहकार्यांशी चर्चा करून एक-दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे राज यांनी या दोघांना सांगितले असल्याचे दिसून येत आहे. याबाबत कोरे यांनी मीडियाला माहिती दिली.
मनसेचे बदलते रंग
- नाशिक पॅटर्न :
महापालिकेत
भाजपसोबत सत्तेत
- ठाणे पॅटर्न १ :
महापालिकेमध्ये आधी
सेना-भाजपला पाठिंबा
- ठाणे पॅटर्न २ :
नंतर काँग्रेस-राष्ट्रवादी
आघाडीला पाठिंबा
- अंबरनाथ पॅटर्न :
नगर परिषदेत
शिवसेना-मनसेची युती
- औरंगाबाद पॅटर्न :
जिल्हा परिषदेत
काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.