www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
मुंबईत महिला छायाचित्रकारावर गँगरेप होण्यापूर्वीही ३१ जुलैला शक्ती मिल कंपाऊंडमध्ये आणखी एका मुलीसोबत गँगरेपची घटना घडल्याचं दोनच दिवसांपूर्वी उघड झालंय. आपला आक्रोश मांडला झी मीडियावर. माझ्यावर पाच जणांनी गलत काम केले. त्यांना कठोरात कठोर सजा दिली पाहिजी, अशी मागणी या पीडिताने केली आहे.
त्या घटनेतील पीडित मुलीनं आपल्यावर झालेल्या अन्यायासंदर्भात तक्रारही दाखल केली आहे. ३१ जुलैला नराधमांच्या दुष्कृत्यांना बळी पडलेल्या धाडसी तरुणीनं झी मीडियावर आपला आक्रोश मांडला आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी तिनं केलीय.
मी आणि माझा मित्र ३१ जुलैच्या सायंकाळी ७.३० वाजता शक्तीमील परिसरात गेलो होतो. मी पहिल्यांदाच तिथे गेली होती. मात्र, यावेळी त्या ठिकाणी दोन जणांनी आम्हाला मारहाण केली. मला फरपटत ओढत नेले आणि माझ्या मित्राला मारहाण करीत पट्ट्यांने बांधून ठेवले. दोघांनी मला आत नेले आणि माझ्यावर गलत काम केले.
त्या दोघांनंतर आणखी तिघे आले. त्यांनीही माझ्यावर जबदस्ती करत गलत काम केले. ही घटना रात्री ७.३० ते ८.०० वाजता घडली. मी खूप घाबरले. मी घरीही गेली नाही. तसेच पोलिसांतही गेली नाही. माझ्यावर गलत काम केल्यानंतर पाचही जण पळून गेलेत. या पाचही जणांनी आम्हाला खूप मारहाण केली. मी त्या पाचही जणांना ओळखले आहे. काळोखात मी तशीच होते. कसं तरी स्वत:ला सावरत तेथून मी माझ्या मित्राबरोबर कसे तरी बाहेर पडलो. मला घरी जाण्याचं धाडसचं झालं नाही. काय करायचे ते समजत नव्हते. माझं आयुष्य त्यांनी बरबाद केलंय. त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे या पिडित तरूणींने सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ