www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ट्रान्स हार्बर लोकलमध्ये एका युवकाची हत्या करण्यात आली आहे. ही घटना आज पहाटे साडेचार वाजता घडली असल्याचं सांगण्यात येत आहे.
तुषार जाधव या 22 वर्षांच्या युवकाची लोकलमध्ये हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पनवेल-ठाणे या लोकलमध्ये ही हत्या झाली आहे. या प्रकऱणी पोलिसांनी तपास सुरू केलाय. तुषार जाधव याच्या हत्येमागील कारण अजून समजू शकलेलं नाही.
ऐरोली येथे राहणारा तुषार रत्नागिरीला इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकतो. गुरुवारी पहाटे तो आपल्या मित्रांसह कोकणकन्या एक्स्प्रेसने परतत असताना पहाटे पनवेल स्थानकावर उतरून पुढे ऐरोलीला जाण्यासाठी निघाला. त्याच्या मित्रापैकी दोघेजण ठाण्याला तर तिघेजण पुढे जाणार होते.
तुषारने ऐरोलीला जाणारी पनवेल-ठाणे पहिली लोकल पकडली. लोकलच्या महिला डब्याच्या पुढील लगेजच्या डब्यात बसून प्रवास करीत असताना घणसोली स्थानकावर महिला डब्यातील पोलिसाला अचानक ओरडण्याचा आवाज आला.
तेव्हा पोलिसाने जाऊन पाहिले असता धारदार शस्त्राने गळा चिरलेल्या अवस्थेत, तुषार रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. नंतर,लोकल ठाण्यात पोहचल्यावर तुषारला तत्काळ सिव्हील रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी,ठाणे रेल्वे पोलिसात शून्य क्रमांकाने हत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपासासाठी नवी मुंबई रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला आहे.
पोलीस हत्यारयांचा शोध घेत असून पनवेल ते ठाण्यासह सर्व स्टेशनवरचे CCTV फुटेज पोलीस तपासत आहेत, तर ही हत्या झाली तेव्हा तुषारकडे दागिने तसेच मोबाईल असे समान होते, परंतु ते काहीच चोरीला गेले नाही, त्यामुळे चोरीच्या उदेशाने ही हत्या झाली नसावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
आता जेव्हा तुषार पनवेलवरून येण्यास निघाला आणि लोकल गाडीत चढला तेव्हा त्याच्याबरोबर कोण होते, त्याचे कोण मित्र होते का ? किंवा कोणी अज्ञात इसम होता का?, याचe तपास पोलीस घेत आहेत .
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.