www.24taas.com, दीपक भातुसे, झी मीडिया, ठाणे
ठाणे जिल्ह्याचं विभाजन करायचं की त्रिभाजन यावर उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्या निर्णय होणार असल्याचं, राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
ठाणे जिल्हा हा राज्यातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा आहे. उत्तर भागात आदिवासींची संख्या आहे. आदिवासींच्या विकासाच्या दृष्टीनेही विभाजन महत्वाचं असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
ठाणे जिल्ह्याचं विभाजन किंवा त्रिभाजन झाल्यानंतर अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेली मागणी पूर्ण होणार आहे. चालू अधिवेशनात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे, हे अधिवेशन शनिवारपर्यंत चालणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.