Budget 2025-26 Income Tax Saving Tips: नोकरदार वर्गाला ज्याप्रमाणं सर्वाधिक चिंता असते ती म्हणजे वार्षिक पगारवाञीची अगदी त्याचप्रमाणं या नोकरदार वर्गाला धास्ती असते ती म्हणजे करपात्र रकमेची. देशातील एका मोठ्या पगारदार वर्गाकडून आयकर आकारला जातो. ठराविक वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी हे धोरण आणि नियम लागू करण्यात येतात जिथं करपात्र रक्कम सरकारकडे जमा करणं अपेक्षित असते.
उत्पन्नावर आकारल्या जाणाऱ्या या करपात्र रकमेमध्ये काही प्रमाणात सवलत मिळावी यासाठीच मग नोकरदार वर्गाचा प्रयत्न सुरू होतो. यावेळीसुद्धा असेच पर्याय अनेकांनी चाचपडून पाहिले आणि या सर्व पर्यायांमध्ये एक अतिशय महत्त्वाचा मार्ग दिसून आला. हा मात्र म्हणजे, करसवलत आणि पैसे वाचवण्यासाठी घरातच्याल Home Minister ची अर्थात पत्नीची मदत घेणं. भारतात अशा काही खास तरतुदी करण्यात आल्या आहेत जिथं चक्क पत्नीच्या मदतीनं Income Tax वाचवता येऊ शकतो.
कमाईचा आकडा दुप्पट करण्यााठी तुम्ही स्वत:सह पत्नीच्या नावे दोन वेगवेगळ्या पीपीएफ अकाऊंटची सुरुवात करू शकता. दोघांच्याही खात्यात 1.5 लाखांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला टॅक्स बेनिफिट क्लेम अर्थात करसवलतीचा दावा करता येतो. इथं तुम्ही 3 लाखांच्या गुंतवणुकीवर सवलतीसाठी दावा करू शकता.
जॉईंट होम लोन
पत्नीसुद्धा नोकरी करत असेल तर, कधीही जॉइंट होम लोन (Joint Home loan) अर्थात दोघांनीही मिळून गृहकर्ज घेण्याचा फायदा होते. या कर्जामध्ये दोन्ही अनुच्छेद 80C अंतर्गत प्रिंसिपलच्या रिपेमेंटवर 1.5 लाख आणि अनुच्छेद 24(b) अंतर्गत व्याजावर 2-2 लाख रुपयांच्या करसवलतीचा दावा करता येतो (tax exemption claim). परिणामी या कर्जामध्ये तुम्हाला जवळपास 7 लाख रुपयांपर्यंतची सवलत मिळते.
पत्नीच्या नावे सुरु करा NPS अकाऊंट
पत्नीच्या नावे NPS (नेशनल पेंशन सिस्टम) हे खातं सुरू करणंही इथं फायद्याचं ठरू शकतं. स्वत:च्या आणि पत्नीच्या खात्यावर गुंतवणूक करत तुम्ही अनुच्छेद 80CCD(1B) अंतर्गत 50,000 रुपयांअंतर्गत वाढीव करसवलतीसाठी दावा करु शकता.
पत्नीच्या बचत खात्यावर व्याज सवलतीचा फायदा
पत्नीच्या नावे एक वेगळं बचत खातं सुरू करत स्वत:सह पत्नीच्या खात्यावर अनुच्छेद 80TTA अंतर्गत 10,000 रुपयांपर्यंतच्या व्याज स्वरुपातील रकमेवर करसवलत मिळलू शकता.
पत्नी आणि कुटुंबाच्या नावे आरोग्य विमा
पत्नी आणि कुटुंबासाठी हेल्थ इंश्योरेंस पॉलिसी (Health Insurance Policy) सुरू केल्यास त्यावर अनुच्छेद 80D अंतर्गत करसवलतीचा दावा करता येतो. याअंतर्गत पती, पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांसाठी आरोग्य विमा योजनेअंतर्गत त्याच्या प्रिमियमवर करसवलतीचा दावा करता येतो. पण, या सवलतीचा फायदा घेण्यासाठी पती आणि पत्नी या दोघांनीही वेगवेगळा विमा काढणं अपेक्षित असतं.