नवी मुंबई: आपल्या मुलीवर सलग सात वर्ष बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला अखेर अटक करण्यात आलीय. मात्र मुलांच्या उदरनिर्वाहासाठी आईला अटक केली नसल्याचं कळतंय.
नवी मुंबईतील जुहूगावामध्ये भाजी विकण्याचा व्यवसाय हा नराधम पिता करायचा. आरोपीला २ मुली आणि ३ मुलं आहेत. आपल्या शिक्षिकेला पत्र लिहून मुलीनं तिच्यावरील अत्याचाराची कथा सांगितली होती.
जेव्हा ती ७ वर्षांची होती तेव्हापासून तिचे पिता तिच्यावर बलात्कार करायचे आणि हे तिच्या आईला माहित असूनही अत्याचारानंतर आई काहीतरी औषध द्यायची, असं पीडित मुलीनं पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर एनजीओच्या मदतीनं मुलीनं आई-वडिलांविरोधात तक्रार नोंदवली.
पोलिसांनी औषधांचाही तपास सुरू केलाय. पीडित मुलीला एक मोठी बहिण आणि ३ भाऊ आहेत. हे लोक घरी नसतांना वडील तिच्यावर अत्याचार करायचे, असं मुलीनं सांगितलं होतं. तसंच मोठ्या बहिणीवरही वडिलांनी पूर्वी अत्याचार केल्याचं ती म्हणाली. शाळेत झालेल्या काऊसलिंगनंतर तिनं हिम्मत करून पत्र लिहिलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.