www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सणासुदीच्या दिवसांत सामान्यांना महागाईचा आता आणखी एक दणका बसणार आहे.. रेल्वे प्रवास सोमवारपासून महागणार आहे. लोकलचा फर्स्ट क्लास प्रवास आणि एक्स्प्रेसच्या दरात वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय.
सोमवारपासून ही दरवाढ लागू होणार आहे... इंधन दरवाढीचे कारण देत रेल्वेने लोकलच्या फर्स्ट क्लास तिकीट दरांत ५ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. तर एक्स्प्रेस आणि मेलच्या प्रवास भाड्यात २ टक्क्यांनी वाढ होणार आहे. असं असलं तरी सेकंड क्लासच्या तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात येणार नाही. सहा महिन्यांआधी रेल्वेनं तिकीट दरात मोठी वाढ केली होती..आता पुन्हा एकदा तिकीट दरवाढ करुन रेल्वेने सामान्यांच्या खिशाला कात्री लावलीय.
त्यामुळं दसरा दिवाळी सण साजरा कसा करायचा अशा विवंचनेत असणा-या सामान्यांचं महागाईनं आता कंबरडं आणखी मो़डणार आहे..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.