मुंबई : स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून, अहमदनगर जिल्ह्याचे सहकार महर्षी विठ्ठलराव विखे-पाटील यांची पणती नीला हिची निवड झाली आहे. अनेक शिक्षण संस्था चालविणाऱ्या अशोक विखे-पाटील यांची ती कन्या, तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची ती पुतणी आहे.
नीला २०१४ सालापासून स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांच्यासोबत काम करीत आहे. नीला २०१२ सालापासून ती सोशल डेमोक्रेट्स पक्षाचे काम करीत आहे, असे अशोक विखे-पाटील यांनी सांगितले.
आता पंतप्रधान कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणून ती करप्रणाली, स्त्री-पुरुष धोरण आणि विकास आदीचा कारभार पाहणार आहे. स्वीडनमध्ये जन्मलेल्या नीला हिने बालपणीचा काही काळ अहमदनगरमध्ये घालविला.
३० वर्षाच्या नीलाने गुटेनबर्ग वाणिज्य विद्यापीठातून वाणिज्य आणि कायदा विषयांत पदवी आणि एमबीए केले आहे. तसेच माद्रिद येथील कॉम्प्युटेंस विद्यापीठातूनही एमबीए केले आहे. नीला ग्रीन पार्टी कार्यकारी मंडळाची सदस्या होती,