मुंबई : मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरूय. मुंबई शहरात 61 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. तर पश्चिम उपनगरांमध्ये 120 मिमी तर पूर्व उपनगरांत 110 मिमी पावसाची नोंद झालीय. ठाणे, कल्याणमध्येही कालपासून पावसानं पुन्हा जोर धरलाय.
पावसामुळे जोगेश्वर ते विक्रोळी रस्ता वाहतूक कोंडीत अडकलाय तर मुंबईतील जेव्हीएलआर उड्डाणपूलाजवळही वाहतूक कोंडी झालीय.
दरम्यान, मध्य रेल्वेवर उल्हासनगरजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनीटे विलंबानं सुरू आहे. सीएसटीकडे जाणाऱ्या गाड्या विलंबानं धावत आहेत. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुमारे १० मिनिटं तर हार्बर रेल्वेवरील वाहतूक सुमारे १० ते १५ मिनिटं उशीराने सुरू आहे.
दरम्यान हवामान खात्यानं येत्या 24 तासांत मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलीय. तूर्तास रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे.
मुंबईतल्या तलावातील पाणीसाठा आणि आत्तापर्यत झालेला पाऊस पाहूयात...
तलाव | पाणीसाठा (मीटर) | पाऊस (मिमी) |
मोडकसागर | 157.66 | 157.66 |
तानसा | 121.95 | 639.60 |
विहार | 76.16 | 1293 |
तुलसी | 138.17 | 1468 |
अप्पर वैतरणा | 596.87 | 658 |
भातसा | 115.12 | 802 |
मध्य वैतरणा | 249.89 | 367 |
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.