मुंबई: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राज्यात नवा वाद निर्माण झालाय. यावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली.
बाबासाहेब पुरंदरेंना हात लावाल तर खबरदार, राज्यात तांडव करेल, असा स्पष्ट इशारा राज ठाकरेंनी दिलाय. बाबासाहेबांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कराबाबत शरद पवार गलिच्छ राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शरद पवारांनी पुरंदरेंचा दोन-तीन वेळा सत्कार केला, तेव्हा त्यांचा इतिहास चुकीचा नव्हता का, असा सवालही त्यांनी केला. ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्यामुळे पवार राजकारण करत असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
तर भालचंद्र नेमाडेंनी कुसुमाग्रज आणि विं. दा. करंदीकर यांच्याकडून काही शिकावं असा सल्ला त्यांनी दिलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.