KBC मध्ये बिग बी महारानीला म्हणाले अभिनेत्री; एपिसोड पाहताच संतप्त मुलाने उडवली निर्मात्यांची खिल्ली

KBC 16 Zubeida Begum : KBC मध्ये बिग बी महारानीला म्हणाले अभिनेत्री; महाराणीच्या मुलानं निर्मात्यांवर दिली संतप्त प्रतिक्रिया

दिक्षा पाटील | Updated: Nov 6, 2024, 01:28 PM IST
KBC मध्ये बिग बी महारानीला म्हणाले अभिनेत्री; एपिसोड पाहताच संतप्त मुलाने उडवली निर्मात्यांची खिल्ली title=
(Photo Credit : Social Media)

KBC 16 Zubeida Begum : ‘कौन बनेगा करोडपति 16’ या शोचा प्रत्येक एपिसोड हा चर्चेत राहतो. दरम्यान, या सगळ्यात एक नवा वाद समोर आला आहे. 5 दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका एपिसोडमध्ये यावेळी शोमध्ये एका प्रश्न विचारण्यात आलं होतं की भारताचा पहिला थिएटर चित्रपट ‘आलम आरा’ मधील अभिनेत्री जुबैदा यांच्या आयुष्याला चुकीच्या पद्धतीनं दाखवलं होतं? यावरून आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. अमिताभ बच्चन यांनी शो दरम्यान, एक चूक केली ज्यामुळे सोशल मीडियावर त्याची चर्चा होत असून अनेक लोक त्यांना ट्रोल करत आहेत. 

खरंतर, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये वरुण धवन आणि सीरिज ‘सिटाडेल’ या आगामी वेब सीरिजचे दिग्दर्शक सीरिजच्या प्रमोशनसाठी पोहोचले होते. त्यावेळी इतिहासाशी संबंधीत एक प्रश्न विचारण्यात आला त्या प्रश्नातून प्रेक्षकांना चुकीची माहिती मिळाली आहे. ज्यामुळे हा सगळा वाद सुरु झाला आहे. प्रश्न असा होता ही कोणत्या अभिनेत्रीचं आणि तिच्या पतीचं अर्थात जोधपुरचे महाराज हनुमत सिंह यांचं विमान अपघातात निधन झाले? 

त्यासाठी त्यांना ऑप्शन देण्यात आले होते की 
A) सुलोचना
B) मुमताज
C) नादिरा
D) जुबैदा

आता नेमकी प्रश्नात काय चूक होती?

अमिताभ यांनी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा तो ऐकून वरुण आणि डीके यांनी जेव्हा प्रश्न ऐकला तेव्हा ते थोडे गोंधळले. त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या दोन लाइफलाइन देखील या प्रश्नासाठी वापरल्या आणि त्यानंतर अखेर त्यांनी D) जुबैदा हा ऑप्शन निवडला. हे उत्तर योग्य होतं. त्यानंतर अमिताभ यांनी या जुबैदा यांच्याविषयी माहिती सांगितली, त्यांनी भारतातील सगळ्यात पहिला बोलपट (पहिला चित्रपट ज्यात डायलॉग्स होते) ‘आलम आरा’ मध्ये काम केलं होतं. त्यांच्या पत्नीच्या आयुष्यावर प्रेरित होऊन ‘जुबैदा’ हा चित्रपट बनवण्यात आला होता. ज्यात करिश्मा कपूर महत्त्वाच्या भूमिकेत होती. 

हेही वाचा : 'पुष्पा 2' चा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित 'छावा' चित्रपटावर परिणाम! निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

काय आहे सत्य?

खरंतर महाराज हनुमत सिंह यांची पत्नी जुबेदा राणी होती. पण त्या कधीच अभिनेत्री नव्हत्या. हे सत्य तेव्हा समोर आलं जेव्हा जुबेदा यांचा मुलगा खालिद मोहम्मदनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. खालिदनं निर्मात्यांवर निशाणा साधत म्हटलं की 'केबीसी अमिताभ बच्चन ही माझी दिवंगत आई जुबेदा बेगम आहे. जेव्हा ‘आलम आरा’ बनवला तेव्हा तिचा जन्म देखील झाला नव्हता. या सगळ्या चुकीच्या माहितीसाठी निर्मात्यांनी माफी मागायला हवी, कारण इतकं तर आता तुम्ही करुच शकतात.' त्याशिवाय त्यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली आणि त्यात म्हटलं की 'मला याचं स्पष्टीकरण मिळू शकतं का? जुबेदा लोकप्रिय अभिनेत्री होती, ज्यांनी आलम आरामध्ये काम केलं. ती माझी आई जुबेदा नाही. माझ्या आईला देखील अभिनय करायचा होता पण वडिलांनी त्याची परवानगी दिली नाही. तुमची रिसर्च टीम अशी गडबड कशी करू शकते?'