www.24taas.com, मुंबई
१४ फेब्रुवारी म्हणजेच ‘व्हेलेंटाईन डे’ला आपल्या पार्टनरसोबत कुठे फिरायला जायचा प्लान करत असाल आणि तेही रिक्षातून प्रवास करत असाल तर सावधान! कारण, याच दिवशी रिक्षाचालकांनी मोर्चाचं आयोजन केलंय. या रिक्षाचालकांचा व्हेलेंटाईन डेला विरोध नाही बरं का… ते मोर्चा काढणार आहेत आपल्या थकीत मागण्यांच्या पूर्ततेसाठी...
रिक्षाचालक-मालकांच्या वैद्यकीय सुविधा, पेन्शन, कमी दरात घर, एक लाख नवीन परमिट, पेन्शन, रिक्षासाठी पार्किंग स्लॉट, चालक-मालकांनासरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा अशा मागण्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. याच मागण्या मांडण्यासाठी मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियननं मोर्चाचा निर्णय घेतलाय. त्यासाठी १४ फेब्रुवारी रोजी वांद्रे येथे परिवहन आयुक्तांच्याकार्यालयावर नेण्यात येणार असल्याचे युनियनचे नेते शशांक राव यांनी सांगितले.
खासगी टॅक्सी कंपन्यांना परमिट दिले जात असताना आम्हाला परमिट का दिले जातनाहीत , असा सवाल युनियनचे सरचिटणीस ए . एल . क्वाड्रोस यांनी केला आहे . शहरातकेवळ ३० हजार टॅक्सींना परमिट असल्याने त्यांच्यावर ताण पडत आहे . १९९७ मध्येलोकसंख्या ८० लाख असताना परमिटची संख्या ६२ हजार होती . लोकसंख्या एक कोटींवरपोहोचली असताना, परमिटची संख्या घटून ३० हजारांवर आली आहे. त्यादृष्टीनेसरकारने नवे परमिट उपलब्ध केले पाहिजे, अशी मागणी युनियनतर्फे करण्यात आली आहे