www.24taas.com, मुंबई
शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन झालंय. कोर्टानं ५० डेसिबलची मर्यादा घालून दिली असताना प्रत्यक्षात ६५ डेसिबल ते १०५ डेसिबल एवढ्या आवाजाची नोंद झाली आहे. त्यामुळं मेळाव्याचे आयोजक सदा सरवणकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
हायकोर्टानं परवानगी देताना ५० डेसिबलची मर्यादा घालून दिली होती. मात्र यंदाही ही मर्यादा पाळण्यात शिवसेनेला अपय़श आलंय. शिवाजी पार्क मुळात ‘सायलेन्स झोन’ असल्यामुळे तिथे दसरा मेळाव्यासाठी न्यायालयाची परवानगी दिली नव्हती. मात्र ५० डेसिबल्सपर्यंतची मर्यादा पाळण्याचे आदेश देत परवानगी दिली होती.
दसरा मेळाव्याला यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वतः उपस्थित नव्हते. शिवसेनेच्या उपनेत्यांनी भाषणं केली. या भाषणांमुळे ५० डेसिबल्सचची मर्यादा ओलांडली गेली.