मुंबई : निवडणूक आयोगाने कर्तव्यदक्ष महिला पोलीस कॉन्स्टेबलचं कौतुक केलं आहे, निश्चितच आयोगाची ही कामगिरी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचं मनोबल वाढवणारं आहे.
सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर आपली गाडी घेऊन मतदार केंद्रात जात होते. मात्र कर्तेव्यदक्ष महिला पोलीस कॉन्स्टेबल डी एस डोईफोडे यांनी शेखर चरेगावकर यांना मतदान केंद्रात जाण्यापासून अडवलं.
मात्र चरेगावकर ऐकण्याच्या तयारीत नव्हते, वास्तविक मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत वाहन नेण्यास मनाई असते, मात्र मी मंत्री आहे, माझ्या गाडीला निवडणूक आयोगाच्या परवानगीचा परवाना लावण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता.
मात्र महिला पोलीस कॉन्स्टेबल डी एस डोईफोडे या नियम समजावून सांगत होत्या, पण त्याचं कुणीही ऐकून घ्यायला तयार नव्हतं. अधिकाऱ्यांनी देखील कानाडोळा केला होता.
मात्र या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, हे प्रकरण मीडियाने उचलून धरलं. यानंतर निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन, या महिला पोलिस कॉन्स्टेबलला पत्र पाठवून कर्तव्यदक्षतेबाबत कौतुक केलं आहे, अशा प्रकारचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.