राजीव पाटील यांना अखेरचा निरोप!

दिग्दर्शक राजीव पाटील यांच्या पार्थिवावर नाशकात अंत्यत शोकाकुल वातावरणात आज अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीचं रुप पालटवणाऱ्या या अवलियाच्या जाण्यानं आज गोदाकाठही हळहळला. राजीव पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी अवघी मराठी चित्रपटसृष्टी उपस्थित होती. शिवाय नाशिकचे महापौर यतिन वाघ, खासदार समीर भुजबळही उपस्थित होते.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 1, 2013, 01:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
दिग्दर्शक राजीव पाटील यांच्या पार्थिवावर नाशकात अंत्यत शोकाकुल वातावरणात आज अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीचं रुप पालटवणाऱ्या या अवलियाच्या जाण्यानं आज गोदाकाठही हळहळला. राजीव पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी अवघी मराठी चित्रपटसृष्टी उपस्थित होती. शिवाय नाशिकचे महापौर यतिन वाघ, खासदार समीर भुजबळही उपस्थित होते.
अवघ्या ४२ व्या वर्षी राजीव पाटील यांच्या एक्झिटमुळं संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीही हळहळली.
राजीव पाटील यांचं काल मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यामुळं निधन झालं. ते ४२ वर्षांचे होते. मुंबईतील भगवती रुग्णालयात त्यांचं निधन झालं. ७२ मैल-एक प्रवास हा त्यांचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.
सावरखेड एक गाव या सिनेमापासून राजीव पाटील यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. मराठीतील साहित्यकृतींवर चित्रपट बनवणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. सनई-चौघडे, पांगिरा, जोगवा हे त्यांचे चित्रपट गाजले होते. जोगवा चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला होता. `वंशवेल` या नव्या सिनेमाचं ते दिग्दर्शन करत होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

पाहा व्हिडिओ