'त्या' वनस्पतीच्या मुळात असे काय होते? चोरण्याच्या प्रकरणात चार जण पोहचले तुरुंगात

Odisha News:ओडिशाच्या भितरकनिका राष्ट्रीय उद्यानातील एक औषधी वनस्पतीची मुळे चोरीला गेल्याने चार जणांना तुरुंगात टाकण्यात आले आहे.   

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 20, 2025, 11:29 AM IST
'त्या' वनस्पतीच्या मुळात असे काय होते? चोरण्याच्या प्रकरणात चार जण पोहचले तुरुंगात title=

Salacia plant roots: ओडिशाच्या भितरकनिका राष्ट्रीय उद्यानातील औषधी वनस्पती चोरीला गेल्याने चार जणांना अटक करण्यात आले आहे. असं काय होतं या वनस्पतीमध्ये, हे प्रकरण नक्की काय आहे हे जाणून घेऊयात. ज्या वनस्पतीच्या मुळांमुळे हे चार जा तुरुंगात गेले ती वनस्पती ही केवळ त्याच्या औषधी गुणधर्मांसाठीच नाही तर पर्यावरण रक्षणासाठीही महत्त्वपूर्ण आहे. चला या वनस्पतीची मुळे चोरण्याच्या धक्कादायक प्रकरणाबद्दल जाणून घेऊयात. 

कोणत्या वनस्पतीची मुळे चोरली?

भितरकनिका राष्ट्रीय उद्यानातील कालीभंजडिहा जंगलात रविवारी वनविभागाच्या गस्ती घालणाऱ्या पथकाने चार जणांना चोरी करताना रंगेहात पकडले. हे लोक सलासिया या महत्त्वाच्या खारफुटीच्या प्रजातीची मुळे आणि देठ जंगलातून तोडून नेत होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीचे साहित्य जप्त केले आहे. 

हे ही वाचा: कशी दिसायची हुस्न की मल्लिका 'अनारकली'? सौंदर्यासाठी अकबराने तिला केले होते हॅरेममध्ये कैद

 

काय आहे वनस्पतीची खासियत? 

सलासियाला स्थानिक भाषेत बटारा असे म्हणतात. बटारा ही एक औषधी वनस्पती आहे. ही वनस्पती मधुमेह आणि रक्तातील साखरेच्या उपचारांमध्ये वापरले जाते. असे घटक या वनस्पतीच्या मुळांमध्ये आढळतात. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. त्यामुळेच त्याची मागणी वाढत असून बेकायदेशीरपणे ही वनस्पती कापण्याच्या घटना समोर येत आहेत.

पर्यावरणाची हानी करण्याचा प्रयत्न

या राष्ट्रीय उद्यानातील खारफुटीची जंगले पर्यावरण संतुलन राखण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. ही  खारफुटीची जंगले नैसर्गिक आपत्तींपासून किनारी भागाचे संरक्षण करतात. याशिवाय जैवविविधतेचेही रक्षण करतात. अशा परिस्थितीत खारफुटीची झाडे तोडणे पर्यावरणासाठी मोठा धोका ठरू शकतो.

हे ही वाचा: रोज रात्री 'या' तेलाने करा पायांच्या तळव्याला मसाज, सांधेदुखीसह निद्रानाशापासून मिळेल आराम

 

कायदेशीर कारवाई आणि शिक्षा

अटक करण्यात आलेल्या आरोपींवर आरक्षित वनक्षेत्रातील बेकायदेशीरपणे झाडे तोडल्याचा आरोप आहे. भारतीय वन कायद्यांतर्गत या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. जंगल आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा: बांगलादेशी प्रेक्षकांकडून हिंदू क्रिकेटरचा अपमान, Live मॅचमध्ये जे घडलं ते पाहून संताप होईल

 

जंगलांच्या संरक्षणात जनतेची भूमिका

वनविभागाने स्थानिक रहिवाशांनी जंगलांच्या रक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, बेकायदेशीर कृत्यांची माहिती तातडीने अधिकाऱ्यांना द्यावी. पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून त्यासाठी जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे.