www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘इंग्लंड फूटबॉल टीम’चा एका चाहत्यानं लंडन ते ब्राझील असं जवळजवळ 24,000 किलोमीटरचा प्रवास आपल्या वेस्पा स्कूटरवर बसून केलाय... यावरून फिफा वर्ल्डकपचा फिव्हर चाहत्यांवर किती चढलाय, याची आपल्याला नक्कीच प्रचिती येऊ शकते.
क्रिस हालेट असं या 44 वर्षीय चाहत्याचं नाव आहे. लंडनहून ब्राझीलपर्यंत प्रवास करण्यासाठी त्याला तब्बल चार महिन्यांचा कालावधी लागला. गेल्या सोमवारी त्याची यात्रा ब्राझीलला पोहचल्यानंतर समाप्त झाली.
हा प्रवास आपल्याला अत्यंत थकवणारा होता, पण त्यात एक वेगळीच मजा होती, असं क्रिस म्हणतोय. एका वर्तमानपत्राशी बोलताना क्रिसनं ‘मी खूप थकलोय... माझी कंबरच सांगतेय की मी 15000 मैल प्रवास केलाय. माझ्याकडे विमानानं ब्राझीलला पोहचून समुद्र तटावर आराम करत फूटबॉल वर्ल्डकप सुरु होण्याची वाट पाहण्याचा आरामदायक पर्याय होता पण, मी हा पर्याय निवडला’ असं क्रिस मजेत सांगतोय.
क्रिसकडे 24 जून रोजी बेलो होरीझोंटे इथं कोस्टा रिका टीम विरुद्ध आपल्या टीमची मॅचचं तिकीट आहे. त्याचं फूटबॉल वेडाखातरचं त्यानं आपल्या आयटी कंपनीची नोकरीचा राजीनामा दिला. आपली आजवरची कमाई ‘स्कूटर्स फॉर गोलपोस्टस’वर खर्च केली आणि यूनिसेफच्या मदतीनं ब्राझीलला पोहचला. आपल्या यात्रेदरम्यान त्यानं फूटबॉल वर्ल्डकपमध्ये सहभागी होणाऱ्या 32 देशांपैकी 18 देशांना पार केलंय. फूटबॉल वर्ल्डकपचं आयोजन 12 जून ते 13 जुलैपर्यंत ब्राझीलच्या 12 शहरांमध्ये होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.