लिअँडर पेस-स्टेपानेक अमेरिकन ओपनचे अजिंक्य

भारताचा टेनिसस्टार लिअँडर पेस आणि त्याचा चेक रिपब्लिकचा साथीदार राडेक स्टेपानेकनं अमेरिकन ओपनचं अजिंक्यपद पटकावलं आहे. पेस-स्टेपानेक जोडीनं पेया आणि सोरेस या द्वितीय मानांकित जोडीवर मात केली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 9, 2013, 08:06 AM IST

www.24taas, झी मीडिया, न्यूयॉर्क
भारताचा टेनिसस्टार लिअँडर पेस आणि त्याचा चेक रिपब्लिकचा साथीदार राडेक स्टेपानेकनं अमेरिकन ओपनचं अजिंक्यपद पटकावलं आहे. पेस-स्टेपानेक जोडीनं पेया आणि सोरेस या द्वितीय मानांकित जोडीवर मात केली.
पेस स्टेपानेकनं ६-१, ६-३ नं फायनल मॅचममध्ये बाजी मारली. या विजेतेपदासह पेसनं आपल्या टेनिस करिअरमधील १४ ग्रँडस्लॅम पटकावलं. त्याचप्रमाणे डबल्समधील पेसचं हे आठव ग्रँडस्लॅम अजिंक्यपद ठरलं आहे. वयाच्या ४० व्या वर्षी लिअँडर पेसनं केलेली ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे.
पेसने स्टेपनेकसह प्रतिस्पर्धी पेया व सौरेस या जोडीवर हुकूमत गाजवली. पहिल्या सेटमध्ये पेस -स्टेपनेकने २४ मिनिटांत ६-१ अशी बाजी मारली. दुसर्‍या सेटमध्ये मात्र ऑस्ट्रिया- ब्राझील खेळाडूंनी त्यांना झुंजवले. ४८ मिनिटे रंगलेल्या या सेटमध्ये पेस-स्टेपनेकने ६-३ अशा बाजीसह किताबही नावावर केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.