पुण्यात अजितदादांच्या खेळीचं काय होणार?

पुण्यात सगळ्याच पक्षांमध्ये कमी अधिक प्रमाणात बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरांनी एकत्र येऊन आघाडीच स्थापन केली आहे. आणि आता राष्ट्रवादीलाच आव्हान दिलं आहे. पुण्यात वडगाव शेरी विकास आघाडीचे तब्बल १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Updated: Feb 8, 2012, 11:54 PM IST

www.24taas.com, पुणे

पुण्यात सगळ्याच पक्षांमध्ये कमी अधिक प्रमाणात बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरांनी एकत्र येऊन आघाडीच स्थापन केली आहे. आणि आता राष्ट्रवादीलाच आव्हान दिलं आहे. पुण्यात वडगाव शेरी विकास आघाडीचे तब्बल १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरांनी  ही आघाडी स्थापन केली आहे. त्यात हानीफ शेख, अलका खाडे, भीमराव खरात, सुनील टिंगरे आणि जॉन पॉल या आजी माजी  नगरसेवकांचा समावेश आहे. आमदार बापू पठारेंच्या घरात पाच तिकीटे दिल्यामुळं कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याच सांगत बंडखोरांनी आघाडी स्थापन केली आहे.

इलेक्टिव मेरीटवरच उमेदवारी दिल्याचं सांगत अजित पवारांनी आमदार बापू पठारेंचं समर्थन केलं आहे. आमदारांचं समर्थन करतानाच बंडखोरांना वाऱ्यावर सोडलेलं नाही असंही अजित पवार सांगत आहेत. अजित पवारांची ही खेळी पक्षाला फायदेशीर ठरते की डोकेदुखी ठरते हे १७ तारखेला दिसून येईल.