मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या यंदाच्या हंगामात ४ संघाचा नव्याने समावेश होणार आहे. आतापर्यंत या लीगमधील संघांची संख्या ८ होती. नव्या संघांचा समावेश झाल्यानंतर ही संख्या १२ वर पोहोचेल.
तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरयाणा या ४ नव्या संघाचा समावेश केला जाईल. सध्या प्रो कबड्डी लीगमध्ये बंगळूरु, हैदराबाद,विशाखापट्टणम, मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, जयपूर आणि पाटणा हे संघ आहेत.
४ संघाचा लीगमध्ये समावेश झाल्यानंतर सामन्यांची संख्याही १३०पर्यंत वाढेल. याशिवाय ही लीग १३ आठवडे सुरु राहील. प्रो कबड्डी लीगच्या चार हंगामाला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला.