सिडनी : येत्या २७ जानेवारीपासून बांगलादेशात सुरु होणाऱ्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकातून तीन वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने माघार घेण्याचा निर्णय घेतलाय. सुरक्षेच्या कारणास्तव माघारीचा निर्णय़ घेण्यात आलाय.
सरकारच्या आदेशानुसार या महिन्याक सुरु होणाऱ्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेसाठी आम्ही संघ न पाठवण्याच निर्णय घेतलाय. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ संघाला बांगलादेश दौऱ्यासाठी परवानगी देण्यात आली नव्हती.
ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयाबद्दल आयसीसी प्रमुखांनी नाराजी व्यक्त केलीये. ऑस्ट्रेलिया बोर्डाचा हा निर्णय निराशाजनक आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय त्यांचाच असेल. मात्र आयसीसी या स्पर्धेत सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे ते म्हणाले.