मोहाली : भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली केवळ आपल्या आक्रमक फलंदाजीसाठीच ओळखला जात नाही तर स्टाईलिश क्रिकेटपटू अशीही त्याची वेगळी ओळख आहे.
दबावातही संयमी फलंदाजी करण्याची त्याची शैली आहे. यावेळी दवाबामध्ये संयम राखण्यासाठी विराट पूजापाठ अथवा ध्यानधारणा करतो का असे त्याला विचारले असता, मी तुम्हाला पूजा-पाठ करणाऱ्यातला वाटतो असा प्रतिप्रश्न केला. नकारात्मक गोष्टींकडे मन लगेच वळते मात्र मी ते करणे टाळतो, असे विराट म्हणाला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी विराट जोरदार तयारी करतोय. हा सामना दोन्ही संघासाठी करो वा मरो असणार आहे.