मुंबई : माजी क्रिकेटपटू झहीर खाननं भारताचा बॉलिंग कोच व्हावं, अशी इच्छा ऑफ स्पिनर हरभजन सिंगनं व्यक्त केली आहे. भारतीय टीमचा कोच म्हणून माझी पसंती झहीरला असेल, असं ट्विट हरभजननं केलं आहे.
२०१५मध्ये झहीर खाननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. झहीरनं भारतासाठी ९२ टेस्ट, २०० वनडे आणि १७ टी-२० खेळल्या. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये झहीरनं ३११ टेस्ट विकेट, २८२ वनडे विकेट आणि १७ टी-२० विकेट घेतल्या. नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या दहाव्या मोसमात झहीरनं दिल्लीचा कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती.