मॅंचेस्टर : भारत विरूध्द इंग्लंड यांच्यात झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा 1 डाव आणि 54 धावांनी इंग्लंडकडून पराभव झाला. भारताचे आघाडीचे खेळाडूंना चांगला खेळ करण्यात सपशेल अपयशी ठरलेत. इंग्लंडच्या बॉलरसमोर नांगी टाकली.
पहिल्या डावात भारताने 152 धावा केल्या. हे आव्हान इंग्लंडने पहिल्याच डावात पार करत आघाडी घेतली. इंग्लंडने 9 बाद 367 रन्स केल्यात. हे लक्ष भारताला पेलवले नाही. भारताचा डाव केवळ तिसऱ्या दिवशी 43 षटकातच आटोपला. पहिल्या डावात इंग्लंडला मिळालेली 215 धावांची महत्त्वाची आघाडीने इंग्लंडची अधिक बळकट केली.
वरुण अॅरोनच्या वेगवान गोलंदाजीवर स्टुअर्ट ब्रॉडने सलग दोन षटकार आणि त्यानंतर पुन्हा एक षटकार मारण्याच्या प्रयत्नांत ब्रॉडच्या तोंडावर अॅरॉनचा बॉल लागला. तो जायबंदी झाला. जखमी ब्रॉड पुन्हा फलंदाजीला उतरला नाही.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीतील दुस:या दिवशी पावसाने आणि भारतीय फलंदाजांनी खोडा घातल्याने इंग्लंडला मोठी आघाडी घेता आली नाही. पहिल्या चेंडूपासून पावसाच्या छायेखाली सुरू असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी लंच आणि टी टाईमच्या काळात फक्त 9 षटकांचा खेळ होऊ शकल्याने इंग्लंडला 85 धावांची आघाडी मिळाली होती. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा इंग्लंडच्या 6 बाद 237 धावा झाल्या होत्या.
त्यानंतर दिवसअखेरीर्पयत खेळ होऊ शकला नाही. खेळपट्टीवर इंग्लंडचे ज्यो रूट 48 आणि जोस बटलर 22 धावांवर खेळत होते. इंग्लंडच्या दोन्ही फलंदाजांनी लंचनंतर 36 धावा केल्या. यानंतर पाऊस सुरू झाल्याने खेळ थांबवावा लागला.
त्याआधी भुवनेश्वर कुमार (47 धावांत 3 बळी) आणि वरुण अॅरोन (48 धावांत 3 बळी) यांनी पहिल्या सत्रात तीन बळी घेत भारताला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली. या दोघांनी इंग्लंडला 6 बाद 201 असे बॅकफूटवर ढकलले होते; परंतु रूट आणि बटलर यांनी डाव सावरला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.