मुंबई : भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आज यशस्वी कर्णधारांच्या पंक्तीत आहे. क्रिकेट चाहते तर त्याचे दिवाने तर आहेतच पण काही खेळाडू देखील धोनीला आदर्श मानतात.
महेंद्रसिंग देखील कोणाचा तरी फॅन आहे हे तुम्हाला माहित नसेल. हा व्यक्ती आहे रामबाबू. रामबाबू हे प्रत्येक मॅचला टीमला सपोर्ट करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतात. मागील ८ वर्षांपासून रामबाबू हे टीमला सपोर्ट करण्यासाठी प्रत्येक मॅचला उपस्थित असतात.
मोहाली येथे राहणारे रामबाबू टीम इंडियाला पुन्हा वर्ल्ड चॅम्पियन बनवण्याची इच्छा मागत मनसा देवी मंदिरात पोहोचले. सायकलवर पुढे धोनीचा फोटो लावून ते मंदिरात पोहोचले.
नागपूरमध्ये होणाऱ्या उद्याच्या मॅचसाठी देखील ते निघाले आहेत. यांचा संपूर्ण खर्च हा स्वत: धोनी करतो. २०१४ मध्ये बांग्लादेशमध्ये जेव्हा धोनीला माहित पडलं की रामबाबूंना ताप आला आहे त्याने त्वरीत डॉक्टरला पाठवून दिले. ताप कमी होत नसल्याने धोनीने रामबाबूंना घरी येण्याचा सल्ला दिल्ला आणि त्यांच्यासाठी विमानाचं तिकीट बूक केलं.
हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या एका मॅचमध्ये रामबाबू हे सतत तिरंगा फडकवत भारतीय टीमला सपोर्ट करत होते. इंनिग संपताच धोनीने रामबाबूला म्हटलं की टीशर्ट घाला नाहीतर तुम्हाला थंडी वाजून येईल. तेव्हापासून धोनी देखील रामबाबूंचा फॅन झाला.