मुंबई : एका मॅचमध्ये १००९ रन करत क्रिकेट विश्वात विश्व रेकॉर्ड आपल्या नावे करणारा कल्याणचा प्रणव धनकवडे आता जगप्रसिद्ध झाला आहे. ज्या बॅटने त्याने १००० रन्स ठोकले त्या बॅट कंपनीने बॅटवर प्रणवचं नाव छापलं जाणार असल्याचं जाहीर केलं आहे.
२०० रन्स केल्यानंतर प्रणवची बॅट तुटली होती. त्यानंतर त्याच्या कोचने त्याला एसएफ कंपनीची बॅट दिली होती. त्यानंतर प्रणवने १००७९ रन्स पूर्ण केले. त्यामुळे कंपनीचं म्हणणे आहे की या रेकॉर्डमध्ये बॅटचे ही योगदान आहे. त्यामुळे कंपनीने बॅटवर P-1009 असं नाव छापणार असल्याचं जाहीर केले आहे.