संघाला निरोप देताना रडला धोनी

  जेव्हा मेलबर्नच्या मैदानावर शेवटचा चेंडू खेळून धोनी पॅव्हेलियनमध्ये जात होता त्यावेळी तो सामान्य होता. पण त्यावेळी त्याने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर करू गेला होता. 

Updated: Dec 31, 2014, 09:28 PM IST
संघाला निरोप देताना रडला धोनी title=

मेलबर्न :   जेव्हा मेलबर्नच्या मैदानावर शेवटचा चेंडू खेळून धोनी पॅव्हेलियनमध्ये जात होता त्यावेळी तो सामान्य होता. पण त्यावेळी त्याने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर करू गेला होता. 

सामना अनिर्णित सोडल्यानंतर टीम इंडियाला सामना गमावला नाही याचे सुख होते. पण त्यावेळी धोनीच्या डोक्यात काही वेगळचं सुरू होत. त्यावेळी त्याने ड्रेसिंग रूममध्ये धोनीने बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांना फोन केला. 

धोनी - संजय, मी धोनी बोलतोय... कसे आहात तुम्ही
संजय - मी ठीक आहे. अचानक का फोन केला. 
धोनी - मी टेस्ट संघाचे कर्णधारपद सोडण्याचा विचार केला आहे. 
संजय - अरे... असे काय झाले, तू इतका मोठा निर्णय घेतला. 
धोनी - येवढेच नाही मी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. 
संजय - अच्छा..
धोनी - पण तू आता घोषणा करू नको... प्रथम मी आपल्या खेळाडूंना या निर्णयाची माहिती देतो...
 

पण संजय पटेल यांच्याशी चर्चा झाल्यानंतर धोनीने आपल्या साथी खेळाडूंना याची माहिती देण्यापूर्वी त्याने आपले एक कर्तव्य पूर्ण केले. खूप शांतपणे तो पत्रकार परिषदेत गेला आणि यश अपयशाबद्दल बोलला. त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. त्याने पांढरा पोषाक उतरविण्याचा निर्णय त्याच्या चेहऱ्यावर दिसला नाही. 

पत्रकार परिषद संपल्यानंतर तो ड्रेसिंग रूममध्ये गेला. त्यावेळी सिडनीची रणनिती आखण्यासाठी आल्याचे सर्वांना वाटले. पण येथे धोनी मोठा निर्णय सांगणार होता. त्याने सर्व खेळाडूंना बोलावले. धोनी वरून खूप सामान्य दिसत होता. पण त्याच्या मनात वादळ उठलं होतं. स्वतःला सावरून  त्याने टीम सदस्यांना सांगितले की, मित्रांनो मी टेस्ट क्रिकेट सोडत आहे. 

या सहा शब्दांनी टीम इंडियाच्या यंगिस्तानच्या रणवीरांच्या अंगावर आभाळ कोसळले. कोणी विचारही करू शकत नाही अशा शब्दात त्याने टेस्टला अलविदा म्हणणार... या ठिकाणी जो उभा होता तो सून्न झाला होता. तो भावी कर्णधार विराट कोहली असो वा ज्याला गब्बर म्हणतात तो शिखर धवन. अजिंक्य राहणे असो वा चेतेश्वर पुजारा किंवा राहुल ज्याला धोनीने ३ नंबरवर पाठवले होते. 

सर्व भावुक आणि सर्व शांत होते. पण ड्रेसिंग रूमची शांतता सर्वाधिक ओरडत होती. ज्या कर्णधाराने टेस्ट टीमला नंबर १ बनविला. त्याने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही काही ऐकून घेतले. सरळ आला आणि आपला निर्णय सांगून दिला. 

चेहऱ्यावर कोणतेही भाव न दाखवता मोठमोठे निर्णय घेतले. वादांना झेलले. विरोधी संघाचे आक्रमणं परतू लावलीत. पण टीमला निरोप देताना त्याच्या डोळ्यांनी त्याला दगा दिला. तो रडला. टीमसाठी आपल्या भावनांना वाट मोकळी करू दिली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.