www.24taas.com, झी मीडिया
एखाद्या सोशल साइटवरून पती-पत्नीमध्ये वाद उद्भवू शकतील आणि ते प्रकरण थेट घटस्फोटापर्यंत जाईल, असा विचार दहा वर्षांपूर्वी कुणी केला असता? कदाचित नाही; परंतु अशी प्रकरणे आता समोर येऊ लागली आहेत. पुण्यात पत्नीने आपले फोटो फेसबुकवर अपलोड केले नाहीत म्हणून संतापलेल्या एका पतिराजांनी थेट काडीमोड घेण्यापर्यंत मजल मारली.
समुपदेशनानंतर सुदैवाने घटस्फोट टळला तरी सोशल साइट्सही आपल्या खासगी जीवनाच्या किती भेदक अंग झाल्या आहेत, याची प्रचिती आली. पत्नीने आपले फोटो फेसबुकवर अपलोड न करता लग्नापूर्वी मैत्रिणींसोबत सहलीवर गेल्याचे फोटो केले, ही पतिराजांची तक्रार होती.
एवढेच नव्हे तर विशिष्ट मैत्रिणीशी पत्नी चॅटिंग करते आणि तिच्याशी जवळीक करते म्हणूनही ते नाराज होते. हे प्रकरण एवढय़ावरच थांबले नाही. पतीने पुण्याच्या महिला सहायता कक्षात तक्रार करून घटस्फोटासाठी अर्जही केला.