www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मायक्रोमॅक्सनं आपला नवा ड्युएल सिम कॅनवास डुडल-३ ए १०२ लॉन्च केलाय. आयपीएल मॅच दरम्यान टीव्हीवर तुम्ही या फोनच्या जाहिराती पाहिल्याच असतील.
मायक्रोमॅक्सचा हा स्मार्टफोन ड्युएल कोअर प्रोसेसरच्या साहाय्यानं चालतो. ६ इंचाच्या या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त रिझोल्युशन आहे. `अँन्ड्रॉईड`ची ऑपरेटींग सिस्टम या फोनमध्ये वापरली गेलीय. तसं पाहिलं तर या फोनमध्ये कोणतंही नवं फिचर नाही. पण, याच फिचरच्या इतर फोनच्या तुलनेत पाहिलं तर या फोनची किंमत तशी कमीच आहे.
या फोनमध्ये एक्सीलरोमीटर आहे. शिवाय यात लाईट आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर आहे. याचा स्क्रि FWVGA रिजोल्यूशन (854 X 489 पिक्सल) आहे. यामध्ये ५ मेगापिक्सलचा ऑटो फोकस कॅमेरा आहे, यामध्ये फ्लॅशही आहे. यामध्ये फ्रंट कॅमेराही आहे जो ७२० पी रेकॉर्डिंग करू शकतो.
कॅनवास डुडल-३ ए १०२ ची वैशिष्ट्ये
* स्क्रीन - ६ इंचाचा डिस्प्ले स्क्रीन
* प्रोसेसर - एमटी ६५७२ ड्युएल कोअर १.३ प्रोसेसर
* रॅम - ५१२ जीबी
* इंटरनल स्टोरेज - ४ Gigs (यात अॅप्ससाठी १.२७ जीबी स्पेस आहे)
* एक्स्टेंन्डेड स्टोरेज कॅपेसिटी - ३२ जीबी (कार्डच्या साहाय्याने)
या स्मार्टफोनमध्ये थ्रीजी, ब्लू टूथ ३.०, वाय-फाय आणि जीपीएससारखे फिचर्सही आहे. यामध्ये २५०० एमएएचची बॅटरी आहे. यामुळे, तुम्हाला ९ तासांचा टॉकटाईम मिळू शकतो. या फोनची किंमत आहे फक्त ८५०० रुपये.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.