माथेरान मिनी ट्रेनची ‘पावसाळी रजा’

नेरळ माथेरानचा प्रवास मिनी ट्रेनच्या सफारीशिवाय अपूर्णच. परंतु सध्या या सफारीला पावसाळी थांबा मिळालाय. गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे या सफारीला विश्रांती देण्यात आलीय.

Updated: Jun 13, 2013, 12:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नेरळ माथेरानचा प्रवास मिनी ट्रेनच्या सफारीशिवाय अपूर्णच... परंतु सध्या या सफारीला पावसाळी थांबा मिळालाय. गेल्या तीन चार दिवसापासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे या सफारीला विश्रांती देण्यात आलीय.
साधारण दरवर्षी १५ जून ते १६ ऑक्टोबर पर्यंत मिनी ट्रेन बंद ठेवण्यात येते.परंतु यावर्षी पावसाचे आगमन लवकरच झाल्यामुळे दरड कोसळण्याच्या भितीने गेल्या सोमवारपासूनच ही मिनी ट्रेन थांबवण्यात आलीय. तरीही, पावसाळ्यात अमन लॉज ते माथेरान ही सेवा सुरूच राहणार आहे.

माथेरानमध्ये प्रसिद्ध असलेली मिनी ट्रेन जरी आकाराने छोटी असली तरी तिने नुकताच देशांर्तगत मोठा विक्रम केलाय. या गाडीने गेल्याच महिन्यात नेरळ ते माथेरान एकाच दिवशी ३०३० प्रवासी घेऊन जाण्याचा विक्रम केलाय. याआधी २९०० प्रवासी नेण्याचा विक्रम दार्जिलिंग हिल ट्रेनच्या नावे होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.