www.24taas.com,रत्नागिरी
पुन्हा एकदा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसाच आघाडी सरकारमधील घटक पक्ष काँग्रेसलाही डिवचलंय. पृथ्वीराज चव्हाण यांना पवार म्हणालेत, मुख्यमंत्री हे वागण वागणं बरे नव्हे.
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या ४९व्या अधिवेशनात शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना कोपरखळी मारली, पुण्यकर्म एसटीचं आणि श्रेय तुमचं. मुख्यमंत्री हे वागणं बरं नव्हे. दानधर्म एसटीने करायचा आणि पुण्य स्वत:च्या पदरात ठाकायचे! यावेळी कामगारांना आपण न्याय मिळवून देऊ, असे पवार म्हणालेत.
दुष्काळामुळे राज्य सरकार संकटात असले तरी लवकरच एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेऊन वेतन कराराबाबत तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन पवार यांनी यावेळी दिले. यावेळी कामगार संघटनेच्यावतीने दुष्काळ सहाय्यता निधी म्हणून ५१ हजार रूपयांचा धनादेश पवारांकडे सुपूर्द करण्यात आला.
दरम्यान, राज्य सरकारने दहा टक्के वेतनवाढ देण्याचे मान्य केले आहे. परंतु संघटनेने साडेबावीस टक्के वेतनवाढ देण्याची मागणी केली आहे. दुष्काळाचा दौरा करताना पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी चर्चा केली आहे, असे पवारंनी स्पष्ट केलं.
राज्य सरकारकडे महामंडळाचे असलेले १७६३ कोटी रूपये देण्याचे सरकारने विचार करायला हवा. एका हप्त्यात ही रक्कम देणे शक्य नसले तरी दोन ते तीन टप्प्यात ही रक्कम द्यावी. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महामंडळासाठी खास तरतूद करण्याची मागणी मुख्यमंत्र्याकडे केली असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.