धनु (व्हॅलेंटाइन डे स्पेशल)

Updated: Feb 14, 2012, 03:52 PM IST

धनु (नोव्हे.२२- डिसें.२१)

तुमचा जोडीदार सध्या तणावाखाली आहे. तेव्हा त्याच्यासोबत व्हॅलेंटाइन्स डे साजरा करताना विशेष काळजी घ्या.

 

व्हॅलेंटाइन्स डे जास्तीत जास्त साध्या आणि शांतपणे साजरा करा. प्रेम, रोमान्स यांच्याबद्दल अति बोलणं टाळा. तुमच्या जोडीदाराला आज त्यात विशेष रस नसेल. चेहरा आनंदी ठेवा.

 

तुमच्या एका हास्यामुळेसुद्धा तुमचा जोडीदाराबरोबरचा दिवस रोमँटिक होऊन जाईल. मनात असलेली चलबिचल आज वाढेल. आपल्या जोडीदाराबद्दलच्या निवडीवर तुम्ही पुन्हा पुन्हा विचार कराल. पण, शांत राहा. विचार करा. आणि त्यानंतरच निर्णय घ्या.

Tags: