घटस्फोटांना जबाबदार 'फेसबूक'

देशभरात घटस्फोटांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. बऱ्याचदा या वाढत्या घटकांना जबाबदार 'तो' असतो की 'ती'?... तर त्याचं उत्तर आहे... फेसबूक ... चमकलात ना! पण, हे खरं आहे.

Updated: May 24, 2012, 06:15 PM IST

www.24taas.com, लंडन

 

देशभरात घटस्फोटांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. बऱ्याचदा या वाढत्या घटकांना जबाबदार 'तो' असतो  की 'ती'?... तर त्याचं उत्तर आहे... फेसबूक ... चमकलात ना! पण, हे खरं आहे.

 

मार्क जुकरबर्ग मागच्या आठवड्यात विवाहाच्या बंधनात अडकला असला तरी त्यानं निर्माण केलेल्या फेसबूकनं आत्तापर्यंत अनेक घरं उद्ध्वस्त केली आहेत. ब्रिटनमध्ये झालेल्या एका सर्वेच्या अहवालात नमूद करण्यात आलंय. जगभरातल्या एक तृतीअंश लोकांच्या घटस्फोटाला मागे फेसबूक हेच कारण ठरलंय, असंही या अहवालात म्हटलं गेलंय.

 

सर्व्हेनुसार, घटस्फोटासाठी अर्ज करणारी जोडपी आपल्या जोडीदाराच्या बाबतीत फेसबूकवर टाकलेल्या आक्षेपार्ह गोष्टीची नोंद करताना दिसून आले. आक्षेपार्ह मॅसेज पाठवण्याच्या कृतींची संख्या यामध्ये सर्वात जास्त आहे. या संस्थेनं मागच्या वर्षी पाच हजार घटस्फोटांच्या अर्जांचा अभ्यास केला होता.

 

अभ्यासकांच्या मते, जर एखाद्याला फ्लर्ट करायचं असेल तर त्यासाठी फेसबूक हा सर्वात सोपा उपाय आहे. ८० टक्के वकिलांचं म्हणण्याप्रमाणे सोशल नेटवर्किंग हा घटस्फोटांसाठी कारणीभूत ठरणारा महत्त्वाचा घटक आहे. ‘फेसबूक एन्ड युअर मॅरेज’ या पुस्तकाचे लेखक जैसन क्राफस्की म्हणतात, पूर्वी कित्येक वर्ष किंवा महिन्यांनंतर सुरु होणारे अफेअर्स आता एका क्लिकमुळे शक्य झालेत. घटस्फोटीत व्यक्तीही आपल्या जुन्या जोडिदारासंबंधी टीका-टीप्पणी करताना मोठ्या प्रमाणात आढळल्याचंही या सर्वेमध्ये नमूद करण्यात आलंय.