पणजी: गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे निकाल उद्या 23 मे रोजी जाहीर होणार आहेत. निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत, विद्यार्थ्याना निकाल सकाळी 6वाजेपासून पाहता येतील.
दहावीची ही परीक्षा 31 मार्च ते 17 एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. राज्यातील एकूण 24 परीक्षाकेंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. परिक्षेस एकून 21,190 विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये 10,447 मुली आणि 10,743 मुलांचा समावेश आहे.
मागील वर्षी 2014मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत 18,103 विद्यार्थी बसले होते. त्यात 9007 मुली होत्या, तर 9096 मुले होती. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांची टक्केवारी 83.51 टक्के होती.
उद्या जाहीर होणारे हे निकाल विद्यार्थ्यांना खालील वेबसाईट्सवर पाहता येणार आहेत.
gbshse.gov.in
goaresults.nic.in
झी24 तास तर्फे सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा!
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.