मुंबई : २५ वर्षांची अभेद्य शिवसेना-भाजप युती तुटली. भाजपने अधिकच्या जागा मागत 'खेळी' करत शिवसेनेशी असलेला घरोबा तोडला. शिवसेनेच्या जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार सेटींग केले. मात्र, त्यात अपयश आल्याने युतीच संपुष्टात आणली. घटक पक्षांना न्याय मिळत नसल्याचे कारण पुढे करत, वेगळे होण्याचा निर्णय घेतला. याबाबत सोशलमीडियात तिखड प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री गुजराती माणूस ठरवणार का?
पोपट मेला तर मरु दे...वाघ जिवंत आहे...शिवसेना. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीमध्ये बसून गुजराती लोकं ठरवणार नाही, मराठी माणूस अजून जिवंत आहे मेलेला नाही, म्हणूनच महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्राची जनता ठरवणार. दिल्लीत बसून कोणी ऐरा गैरा गुजराती शाह"णा" नाही ठरवणार. मराठ्यानो उठा जागे व्हा आणि दाखवा आपली मराठी मातीतली ताकद. फक्त शिवसेनेचा आणि मराठी माणसाचा आवाज महाराष्ट्रात चालणार.
अरे भाजपनी अटलजी , अडवाणी , मुरली मनोहर जोशी याना दगा दिला. आता भाजप-वाल्यानो भोगा तुमच्या "कमला (कार्मा)ची" फळ या निवडणुकीत. फक्त आणि फक्त शिवसेना. 'जय हिंद-जय महाराष्ट्र, जय बाळासाहेब'
सतेचा माज उत्तरणार....हा महाराष्ट्र आहे इथे शहा्गिरी चालत नाही..इथे फक्त शिवशाही चालते. भाजप पुढे सेना अजिबात झुकणार नाही. आज १३५ जागा मागत आहेत. उद्या २०० मागतील. यांचा पंतप्रधान झाला म्हणून जास्त लाड खपवून घेतले जाणार नाहीत. महाराष्ट्रात सेनेशिवाय दुसरा पर्याय नाही. कधी नव्हे तो मराठी माणूस जागा झाला आहे आणि तो शिवसेनेची सत्ता आल्याशिवाय शांत बसणार नाही. जय महाराष्ट्र !!!
एक शिवसैनिक आणि हिंदुत्ववादी म्हणून भाजप वाल्यांना एकच सांगू इच्छितो....... बाबरी पडली तेव्हा तुम्ही तोंड लपवलित पण आमच्या साहेबांनी उघड माथ्याने अभिमान व्यक्त केला. आमच्यावर.... गेल्या २५ वर्षात लोकांसाठी राडे -आंदोलन करताना या महाराष्ट्राने कधी भंडारी.. तावडे.,. खडसे…फडणवीस अशी आडनाव ऐकली नाहीत. त्यांनी फक्त ऐकलं आणि बघितलं ते फक्त आणि फक्त ठाकरे ना!!!
तुमचे सर्वेसर्वा कधी दिल्लीतला असतो, कधी युपीतला, कधी गुजरात मधला....पण आमचा याच मातीतला आहे... मातोश्री मधला.. तुमची तोंड बदलतात नेता बदलला की पण आम्ही आजही मातोश्री समोरच झुकतो आणि मातोश्रीचच ऐकतो ….
मातोश्री अजून तशीच आहे ताठ कण्याची.. म्हणून हिशोबात राहा.. हा साहेबांचा महाराष्ट्र आहे...!!!!
सर्वांनाच फटकारले...या कवितेतून
ना 'शरदा'चे चांदणे,
ना 'सोनिया'चा दिस..
'घड्याळा'चे ओझे 'हाता'ला,
म्हणून 'आय्' कासावीस..!
'कमळा'च्या पाकळ्यांची,
'यादवी' छ्ळते मनाला..
'धनुष्य' आलयं मोडकळीस,
पण जाणीव नाही 'बाणा'ला..!
'विळा, हातोडीला'ला,
आजच्या युगात स्थान नाही..
डब्यांना ओढू शकेल एवढी,
'इंजिना'त जान नाही..!
'मन' आहे 'मुलायम',
पण 'माया' कुठेच दिसत नाही..
'हत्ती'वरून फिरणारा,
'सायकल'वर बसत नाही..!
कितीही उघडी ठेवा 'कवाडे',
'प्रकाश' आत जाणार नाही..
विसरलेले 'आठवले' तरीही,
'गवई' गीत गाणार नाही..!
'बंडखोर पक्षां'चा थवा,
'पार्टी'साठी आतूर..
कुंपणच खातय शेताला,
आणि बुजगावणंही फितूर..!
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.