मुंबई : टेडी बिअरचा जन्म १५ फेब्रुवारी रोजी १९०३ रोजी झाला. कारण पहिला टेडी बेअर बाजारात याच दिवशी आला, मात्र टेडी बेअरच्या जन्मामागे एक कथा आहे.
टेडी बेअरची जन्मकथा एका अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या नावासोबत जोडली गेली आहे. यामुळेच ही घटना चर्चेत आली आणि टेडी बेअरचा जन्म झाला असं म्हटलं जातं.
अमेरिकेचे २६वे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुजवेल्ट एकदा शिकारीला गेले. रुजवेल्ट यांच्या सेवकांनी जंगलात एक अस्वल पकडलं, ते झाडाला बांधलं, आणि राष्ट्राध्यक्षांना त्या अस्वलाला गोळी मारण्यासाठी बोलावण्यात आलं. रुजवेल्ट आले, पण बांधलेलं अस्वल त्यांनी काही मारलं नाही. त्या अस्वलाला नंतर सोडून देण्यात आलं.
या घटनेची त्यावेळी बरीच चर्चा झाली, आणि 1902 साली मॉरिस मिचटम यांनी पहिल्यांदा एक कापडाचं अस्वल तयार केलं. त्या अस्वलाला त्यांनी नाव दिलं- Teddy’s Bear. या नावाचं कारण म्हणजे, राष्ट्राध्यक्षांचं टोपण नाव टेडी होतं.
यानंतर मॉरिस मिचटम यांनी स्वतः राष्ट्राध्यक्षांना पत्र लिहून त्यांचं नाव वापरण्याची परवानगी मागितली आणि त्यांना ती मिळालीही. मग तेव्हापासून टेडी बेअर बाजारात आले. अनेक कंपन्यांनी हे टेडी बेअर विकायला सुरुवात केली आणि आज तो आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचलाय.