लंडन : ‘वर्ल्ड वाइड वेब’चे (डब्ल्यूडब्यूडब्ल्यू) ब्रिटिश शोधकर्त्यानंच आता इंटरनेटच्या स्वातंत्र्यावरला धोका असल्याचं सांगितलंय.
वेगवेगळे सरकार आणि इंटरनेटवर नियंत्रण ठेवण्यात रुची असणाऱ्या बड्या कंपन्यांकडून इंटरनेटच्या स्वातंत्र्याला धोका असल्याचं कम्प्युटर वैज्ञानिक टीम बर्नस-ली यांनी म्हटलंय.
२५ वर्षांपूर्वी टीम बर्नस-लीनं ‘वेब’चा शोध लावला होता. याच बर्नस-लीनं आता एका विशिष्ट विधेयकाची मागणी केलीय. इंटरनेटचं स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी आणि वापरकर्त्यांच्या खाजगी माहितीचं संरक्षण करण्याची मागणी या विधेयकात करण्यात आलीय.
बर्नस-ली यांनी लंडन ‘वंब वी वॉन्ट’ कार्यक्रमात इंटरनेटच्या भविष्यावर भाष्य केलंय. ‘एखादी कंपनी इंटरनेवर तुमच्या हालचाली नियंत्रित करू शकत असेल किंवा ज्या वेबसाईटचा लोक जास्तीत जास्त वापर करतात अशा वेबसाईट नियंत्रित करू शकत असेल तर अशा कंपनी तुमच्या जीवनावरच नियंत्रण आहे’
५९ वर्षीय बर्नस-ली इंटरनेटच्या विकासासाठी दिशानिर्देश बनवणाऱ्या संस्था ‘वर्ल्ड वाइड वेब कंसोर्टियम’चे अध्यक्ष आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.