नवी दिल्ली : आयफोनचं वेड तरुणांच्या डोक्यात गेलंय... महागडा आयफोन मिळवण्यासाठी काही जण काहीही करायला तयार आहेत.
‘आयफोन -6’ आणि ‘आयफोन – 6 प्लस’ लवकरात लवकर बाजारात येण्याची वाट अनेक जण पाहत होते. अॅपलनं 9 सप्टेंबर रोजी एका मोठ्या कार्यक्रमात थाटामाटात हा फोन लॉन्चही केला. पण, जेव्हा या फोनची किंमत लोकांना माहित पडली, तेव्हा मात्र अनेकांचं स्वप्न एका झटक्यात तुटलं... पण, या फोनची क्रेझ इतकी पसरलीय की हा फोन मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तयार आहेत.
सौदी अरेबियातही अशीच एक घटना घडलीय. इथं एका तरुणानं आपल्या बहिणीशी विवाह करू इच्छिणाऱ्या एका तरुणाकडे लग्नासाठी एक अजब मागणी समोर ठेवली. तुला माझ्या बहिणीशी लग्न करायचं असेल तर मला एक आयफोन – 6 गिफ्ट करावा लागेल, अशी अट एका भावानं समोर ठेवली. आयफोन दिला नाही तर लग्न होणं कठिण असल्याचंही त्यानं सांगितलं.
सौदी अरेबियात लग्नाच्या वेळी गिफ्टसचं आदान-प्रदान होतं. याच गोष्टीचा फायदा या तरुणानं उठवलाय.
गंमत म्हणजे, आयफोन – 6 आणि आयफोन – 6 प्लस 19 सप्टेंबरपासून अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, जर्मन, सिंगापूर, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि जपानमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. सौदी अरेबियात हा फोन अजून तरी उपलब्ध झालेला नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.