अकोल्यात भारिप नेत्याची निर्घृण हत्या

पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Updated: Aug 20, 2018, 08:18 AM IST
 अकोल्यात भारिप नेत्याची निर्घृण हत्या title=

अकोला: भारतीय बहुजन पक्षाचे नेते आसिफ खान यांच्या हत्येने अकोला शहर हादरले आहे. गेल्या पंधरा दिवसांत ही शहरातील दुसरी राजकीय हत्या आहे. १६ ऑगस्टपासून आसिफ खान बेपत्ता होते. त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु होता. अखेर पूर्णा नदीच्या पात्रात त्यांचा मृतदेह सापडला. 
 
 या घटनेनंतर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. या संशयितांची नावे पोलिसांनी अद्याप जाहीर केलेली नाहीत. काही दिवसांपूर्वी पैशाच्या वादातून आम आदमी पक्षाचे नेते मुकीम अहमद यांचाही खून करण्यात आला होता. 

आसिफखान हे अकोला जिल्ह्यातील वाडागाव तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक होते. येथील वाडेगावचे ते सरपंचही होते. २०१४ मध्ये अकोला पश्चिम मतदारसंघातून ते निवडणुकीसाठी उभे राहिले होते. यावेळी त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.